रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचा नोकरीचा प्रश्‍न सोडवावा – किशोर म्हात्रे

। नागोठणे । वार्ताहर ।
रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचा नोकरीचा प्रश्‍न गेली 35 वर्ष ताटकळत पडला आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती हा नोकरीचा प्रश्‍न जो पर्यंत सुटत नाही तो पर्यंत लढा लढत राहू. प्रसंगी प्राण गेला तरी चालेल असा निर्धार स्थानिक प्रकल्पग्रस्त समितीने केलेला असल्याचे समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आय.पी.सी.एल.ह्या केंद्र सरकारच्या कारखान्याबरोबर झालेला करार व त्यानंतर 2005 मध्ये रिलायन्स बरोबर केंद्र सरकारने केलेला करार त्या करारामध्येच उर्वरीत प्रकल्पग्रस्तांचा नोकरीचा प्रश्‍न सुटायला हवा होता. स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या बेमुदत उपोषणाच्या आपल्या चर्चेतून प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात उर्वरित 585 दाखलेधारकांची यादी समाविष्ट केलेली आहे. त्या दाखलेधारकांना त्वरीत रिलायन्स प्रकल्पामध्ये कायमस्वरुपी नोकरीत समाविष्ट करुन घेण्यासाठी जरुर ते आदेश जिल्हाधिकारी यांनी रिलायन्स कंपनीला द्यावेत अशी विनंती प्रकंपग्रस्तांचे नेते किशोर म्हात्रे यांनी जिल्हाधिकार्‍यांना केली आहे.

Exit mobile version