| अलिबाग | प्रतिनिधी |
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या खोपोली शाखेचे महामार्गावरील युनिमाउंट एंपायर इमारतीमधील पहिल्या मजल्यावर रविवारी दि.29 जुलै रोजी स्थलांतर करण्यात आले. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची ही 18 वी शाखा असून 6 महिन्यापूर्वी एका भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आली होती.
सहा महिन्यांत शाखेचा व्यवसाय 2 कोटी इतका झाला आहे. त्यामुळे आता ही शाखा स्वमालकीच्या जागेत स्थलांतरीत करण्यात आली आहे. खालापूर तालुक्याचे सहकारी संस्था सहाय्यक निबंधक नीलेश शिंदे यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांच्यासह आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आदर्श पतसंस्थेची माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष कैलास जगे यांनी आभार व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य अधिकारी उमेश पाटील यांनी केले. यावेळी संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजीत पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे, संचालक अनंत म्हात्रे, सतीश प्रधान, विलाप सरतांडेल, भगवान वेटकोळी, रामभाऊ गोरीवले, तज्ञ संचालक संजय राऊत, तज्ज्ञ संचालक डॉ. मकरंद आठवले व सीईओ मीनाक्षी पाटील आदी उपस्थित होते.
आदर्श पतसंस्थेच्या खापोली शाखेचे स्थलांतर
