। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड भुषण प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज उर्फ (बापू) यांचे शनिवारी (दि. 04) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ (डोलवी) या गावी सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बापूंच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण रायगडमधील वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे. त्यांचा रायगड जिल्ह्यात वारकरी सांप्रदाय वाढविण्यासाठी अतिशय मोलाचा वाटा होता.