| पनवेल | वार्ताहर |
खारघर रेल्वे स्थानकाजवळ लोकल गाडीची धडक लागून गंभीर जखमी झालेल्या अज्ञात इसमाचा मृत्यू झाला आहे. घडलेल्या या अपघातातील मृत इसमाची अद्यापी ओळख पटली नसून पोलिस मृताच्या वारसांचा शोध घेत आहेत. मृत इसमाची उंची साडेपाच फुट असून, काळ्या व निळ्या रंगाचा फुल बाह्यांचा हिरव्या रंगाचा कॉलर असलेला टी शर्ट व नेसणीस निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट असे कपडे त्याच्या अंगावर आहेत. उजव्या खुब्याचे बाजूस जुने ऑपरेशन झालेले निशाण ओळख चिन्ह आहे. तपासी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक स.पी.भोसले, हे आहेत. नमूद वर्णनाच्या इसमाच्या वारसाचा शोध लागल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे पोलिस उपनिरीक्षक एस.पी.भोसले (9823080292) व स.पो.उप.निरीक्षक श्रीकृष्ण वेदपाठक ( 9870157850) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.