गणेश विसर्जन घाटाची दुरुस्ती

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| म्हसळा | प्रतिनिधी |

खा. सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून म्हसळा शहरातील मुख्य हिंगुलडोह विसर्जन घाट परिसरात नव्याने पर्यटन विकास होत असल्याने सद्यःस्थितीत येथे गणेशमूर्ती विसर्जन करण्यात थोडे गैरसोयीचे झाले आहे. गणेशभक्तांना गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यात गैरसोय होऊ नये यासाठी म्हसळा नगर पंचायतीने पुढाकार घेऊन याच नदीपात्रातील जुने गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येणाऱ्या मोकळ्या परिसराची स्वच्छता व देखभाल दुरुस्तीचे काम करून गैरसोय दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांच्या उपस्थितीत कामाची पाहणी केली.

Exit mobile version