रांगोळीतून साकारली एकवीरेची प्रतिकृती

। चिरनेर । वार्ताहर ।
चिरनेर कातलपाडा येथील कस्तुरी म्हात्रे हिने दीपावलीच्या सणानिमित्त रांगोळीतून आदिमाया आदिशक्ती एकविरा आईची सुंदर अशी प्रतिकृती साकारली असून, कस्तुरी म्हात्रे हिच्या कलेचा आविष्कार येथे प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे.

रंगांची जादू आणि जीव ओतून रांगोळीत आणलेला जिवंतपणा एकूणच रांगोळीची भव्यता पाहताना प्रत्यक्ष अनुभव येतो. कस्तुरी म्हात्रे आणि तिच्या बहिणी स्वरा म्हात्रे व पूर्वा म्हात्रे यांनी या रांगोळीसाठी चार तास वेळ देत ही रांगोळी साकारली आहे. यासाठी त्यांनी एक किलो रांगोळीच्या रंगांचा वापर केला आहे. या रांगोळीचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल झाले असून कस्तुरी म्हात्रे हिला याबद्दल अभिनंदनाच्या कमेन्ट्स येत आहेत. कस्तुरी, स्वरा व पूर्वा यांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version