धोदाणी-माथेरान रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील आणि मुंबई पासूनचे सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये येण्यासाठी पर्यायी रस्ता बनविण्यात यावा, यासाठी माथेरानकर अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहेत. दरम्यान, पनवेल धोदाणी-माथेरान या रस्त्याच्या मागणीसाठी जनार्दन पारटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देवून केली आहे.

निसर्गरम्य माथेरान येथील पर्यटन स्थळाकरिता आपतकालीन रस्ता असणे ही काळाची गरज आहे. मुंबई शहराला जोडणारा अत्यंत जवळचा रस्ता धोदाणी-माथेरान सन 1980 रोजी राज्य सरकारच्या आराखड्यात मंजुर झालेला आहे. मात्र, हा रस्ता पुर्ण झालेलाच नाही, राजकीय उदासीनता यामुळे हा रस्ता आजही कागदावर आहे. माथेरानला जाण्यासाठी पर्यायी रस्ता असलेल्या धोदाणी-माथेरान रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. माथेरान या पर्यटन स्थळाची दळण वळणाची समस्या कायमस्वरूपी दुर करुन रायगड जिल्हयातील प्रसिध्द असलेले निसर्ग रम्य असे माथेरान या पर्यटन स्थळाला दळण वळण सुविधा वाढणार आहे.

शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आरखडायात असलेल्या पनवेल धोदाणी-माथेरान रस्त्याला मंजुरी द्यावी, अशी मागणी जनार्दन पारटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देवून केली आहे.

Exit mobile version