बचाव समितीचे कॅण्डल मार्च

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील पाली येथील सायडोंगर धरण प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी दि.22 नोव्हेंबर रोजी तालुक्यात एकाच वेळी सर्वत्र कॅण्डल मार्च काढला जाणार आहे. कर्जत पर्यावरण बचाव समिती आणि शिवसेना ठाकरे गट यांनी सह्याद्री बचाव मोहीम हाती घेतली असून, पाली सायडोंगर येथील प्रकल्प रद्दच झाला पाहिजे, अशी हाक मोर्चाच्या दरम्यान दिली जाणार आहे.

साई डोंगर प्रकल्प रद्द आणि सह्याद्री बचाव मोहीमेअंतर्गत कर्जत बंद यशस्वी झाल्यानंतर कर्जत पर्यावरण बचाव समिती आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोबत कर्जत तालुक्यात एकाच दिवशी कॅण्डल मार्च काढण्याचा निर्धार जाहीर केला आहे. कर्जत तालुक्यातील साईडोंगर येथील प्रकल्प रद्द आणि सह्याद्रीचे नैसर्गिक सौंदर्य, वनसंपदा, जैवविविधता आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी तसेच टोरंटखटाव प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी सह्याद्री बचाव मोहीम व कॅण्डल मार्च आयोजित करण्यात येत आहे. या मोहिमेत सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध संस्था, युवक मंडळे, महिला मंडळे, पर्यावरणप्रेमी आणि जनतेने मतभेद बाजूला ठेवून निसर्गाच्या रक्षणासाठी एकत्र यावे आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन कर्जत पर्यावरण बचाव समितीच्यावतीने करण्यात आले ओहे. या मोहिमेदरम्यान कशेळे, कळंब, कडाव, कर्जत आणि नेरळ या मार्गावर सह्याद्री आणि साई डोंगराच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

Exit mobile version