। खोपोली । वार्ताहर ।
महोत्सवी वर्षानिमित्ताने प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी पद्धती प्रकल्प आणि कृष्ण वनस्पती रोगशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अळंबी प्रशिक्षण प्रात्याक्षिकासह आयोजित करण्यात आले.
नवहार सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी भगन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास डॉ. बाघमोड यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी ठाणे व रायगड जिल्ह्यातील एकूण 30 पक्षणार्थी सहभाग घेतला होता. प्रशिक्षणार्थीनां प्रात्यक्षिकास प्रशिक्षण डॉ. जी. डी. पाटील यांनी दिले.डॉ. मध्यवर यांनी प्रास्ताविक केले. अशोक पाटील, खरीवली, संतोष धुडे,जमरूदव, वामन रांगोळे, नवहार, प्रदीप वेखंडे, चंदरोरी शहापूर, संगीता बांगर, फलेगाव कल्याण आणि रतन बिटकै, खरबई खालापूर यांनी प्रशिक्षणासंदर्भात आलेले अनुभव व त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. आभार प्रदर्शन डॉ. आर. जी. मली यांनी केले. प्रशिक्षणात्यतीरिक्त सदर कार्यक्रमास केंद्रावरील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारीवृंद उपस्थित होते.