कळवे येथील आरोग्य शिबिराला प्रतिसाद

| हमरापूर | वार्ताहर |

उन्नती हॉस्पीटल आणि आय.सी.यु. पनवेल व श्रमिक थळ सामाजिक विकास संस्था कळवे-पेण यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कळवे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबीरामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण, मुतखडा दुर्बीणद्वारे उपचार, मुतखडयांसाठी लिथोदिप्सी (विना शस्त्रक्रिया), मुत्रपिंड, मुत्रमार्ग विकार, डायलेसिस, आर्थोस्कोपी (गुडघ्याची शस्त्रक्रिया), पौरुष ग्रंथी (प्रोस्टेट ग्रंथी ऑपरेशन) यांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.

यावेळी सरपंच सतीश पाटील, किरण विनायक पाटील, शंकर पाटील, डॉ. समाधान पाटील, डॉ. पांडुरंग वराळ, आरती चेरफळे, वर्षदा पाटील, जगदीश पाटील, श्रीकांत किल्लेकर, मनोज पाटील, जगवीश पाटील, निर्णय बाणेश्वर पाटील आदी उपस्तिथ होते.

Exit mobile version