प्रबोधन संस्थेतर्फे आरोग्य शिबिरास प्रतिसाद

| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रबोधन सामाजिक सेवा संस्था व ग्रामपंचायत पेढांबे यांच्या संयुक्त विद्यमाने पेढांबे येथील रा.जि.प. प्राथमिक शाळा येथे होमिओपॅथी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात मान, पाठ, गुडघे, पायटाच, खांदे इत्यादी दुखणी असलेल्या एकूण 50 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली ,तसेच औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.

डॉ. मिलिंद पाटील, डॉ. अर्चना पाटील यांनी रूग्ण तपासणी केली. तर नर्सेस सिद्धी भिसे, प्रज्ञा जांभेकर, मयुरी बिस्वास यांनी रूग्णांस औषधे देण्याचे काम केले.शिबिर यशस्वी करण्यास ग्रामपंचायत पेढांबे सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचारी यांनी सहकार्य केले. अजित पाटील यांनी विशेष योगदान दिले. संस्थेचे सदस्य अनंत मसाल, सुप्रिया म्हात्रे यांनी हातभार लावला. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. गणेश गोविंद पाटील व सदस्य मनिषा गणेश पाटील हे देखील उपस्थित होते.

Exit mobile version