| महाड | वार्ताहर |
लाडवली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 4 फाउंडेशन, जनसंवाद आणि लोकजागर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या शिबिरामध्ये दात, डोळे, हिमोग्लोबिन आदी तपासण्या डॉ. प्रथमेश, डॉ. सिद्धी, राम पाटील, तसेच जनकल्याण रक्तपेढीच्या पथकांनी तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. यावेळी महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने, मोदींना ढोकळे, जगन्नाथ साळुंखे, निलेश पवार, दीपक बेटकर, चंद्रकांत कोकणे, उदय सावंत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पवार यांनी केले, तर निलेश पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.





