उरण मध्ये शोभा यात्रेला प्रतिसाग

। उरण । वार्ताहर ।
उरणमध्ये जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरपालिका शाळेत गुढीचे विधिवत पूजन करण्यात आले.
डॉ नानासाहेब धर्माधिकारी नगरपालिका मैदानातून शोभायात्रा विवेकानंद चौक, गणपती मंदिर, विमला तलाव, एन.आय. स्कूलमार्गे, नगरपालिका मैदानात विसर्जन करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पत्रकार पालु भिंड, सचिव उमेश नाईक, पदाधिकारी सुळे, माजी अध्यक्ष कुलकर्णी, शेकापशहर चिटणीस शेखर पाटील, काँग्रेसचे हेमंत पाटील, शिवसेनेचे नगरसेवक गणेश शिंदे,सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार, वायकुळे सर, शर्मा सर, माजी नगराध्यक्ष गायकवाड , हसमुख शेठ आदी नागरिक व स्त्रिया पारंपरिक वेषात उपस्थित होत. कोरोना काळानंतर पहिल्या नंदा शोभा यात्रेचे आयोजन झाले यामुळे नागरिकांत मोठा उत्सव दिसत होता

Exit mobile version