। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हाधिकार कार्यालयातील सेवानिवृत्त तहसीलदार आनंद पांडुरंग नारे यांचे शनिवारी (दि. 28) रात्री निधन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात ते अनेक वर्षे विविध जिल्हाधिकार्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. यामुळे त्यांचा संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचय झाला होता. त्यानंतर त्यांनी पनवेल, खालापूर आदी ठिकाणी तहसीलदार म्हणून काम पाहिले. अखेरच्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ते महसूल विभागाचे चिटणीस म्हणून सेवानिवृत्त झाले. अत्यंत सुस्वभावी, हसतमुख अशी त्यांची ख्याती होती. यामुळे ते अधिकारी, कर्मचारी वर्गातही लोकप्रिय होते. शनिवारी त्यांची प्राणज्योत मालविली. रविवारी (दि. 29) त्यांच्या पार्थिवावर श्रीबाग स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्ययात्रेस अलिबागमधील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.