क्लुझर जीप-ऑटो रिक्षा अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू

| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहरातील काळ नदी पुलावर मुंबई-गोवा महामार्गावर क्लुझर जीप-ऑटो रिक्षा या वाहनांमध्ये धडक लागून झालेल्या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सविस्तर वृत्त असे की, दि. 3 मार्च रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास काळ नदी पुलावर माणगाव बाजूकडून महाड बाजूकडे जाणारी ऑटो रिक्षा क्र. 06 बीव्ही 3166 व महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारी क्लुझर जीप या दोन वाहनांमध्ये धडक होऊन अपघात झाला. या अपघातात ऑटो रिक्षा चालक नदीम अब्दुल सत्तार वाडेकर (40), रा. लोणाशी मोहल्ला, माणगाव यांचा उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातातील क्रूझर गाडी अपघात होताच घटनास्थळावरून निघून गेली. पोलिसांनी ती गाडी पकडली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करीत आहेत.

Exit mobile version