| रोहा | वार्ताहर |
रोहा शहरातील अंधार आळीतील अविनाश निंबाळकर यांचा सुपुत्र ऋग्वेद निंबाळकर (19) याने प्लॉरिडा अमेरिका मेरिट आयलंड येथे एक वर्षाचे कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण यशस्वी केले. ऋग्वेद हा रोह्यातील पहिला तरुण पायलट ठरला असून, त्यानंतर तो इंडियन लायसन्स परीक्षा देणार आहे. ते पूर्ण झाल्यावर देशांतर्गत विमान चालविणार आहे.
रोह्यातील जे.एम. राठी इंग्लिश स्कूल येथे 12 वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याची टू.फाय.एस. एल.वाय. या कंपनीतर्फे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. एक मराठी मुलगा पायलट होणार म्हणून रोहेकारांना अभिमान आहे. रोह्याचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी त्याच्या निवासस्थानी जाऊन त्याचा पुष्पगुछ प्रदान करून सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ऋग्वेदचे आई वडील व अन्य नातेवाईक उपस्थित होते.