आपटा गावात शिरले नदीचे पाणी

| आपटा | वार्ताहर |
काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीचे पाणी आपटा गावात घुसले आहे. त्यामुळे जुना कोळीवाडा, मोहल्ला, जुनी पिंपळ आळी, आपटा खिंड व बापूजी देवस्थानच्या आवारात पाताळगंगा नदीचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाताळगंगा नदीच्या पात्रात भर टाकून काहींनी बांधकाम केले आहे. परिणामी, गाव पाण्याखाली जाण्याच्या घटना वारंवार घडत असल्याची चर्चा होत आहेत. आपटा गावातील नवीन होणारी ग्रामपंचायतीची नवीन इमारत पूररेषेमध्ये असल्याने गेले वर्षभर ही इमारत अपूर्ण अवस्थेत आहे. आपटा बस स्टँडची फारच दुरवस्था झाली असून, याकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ नाही, याबाबत ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सध्या एक ना अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या आपटा ग्रामस्थांना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यात अधिक भर पडत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Exit mobile version