। अलिबाग । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित न्यु मॉडर्न इंग्रजी माध्यम शाळा शिस्ते बोर्ली-पंचतनमध्ये पारितोषिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह तथा शेकाप जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुलांना शाळेय क्रीडा स्पर्धेतील बक्षिसे तसेच रंगोत्सव स्पर्धेतील बक्षिसांचे वाटप चित्रलेखा पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी आपल्या मनोगतात मुलांना नेहमी आनंदित रहा, असा सल्ला दिला. विशेष म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक संतोष मुरकर यांच्या कामाची वाहवाह करत शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्वर्गीय प्रभाकर पाटील व भाई जयंत पाटील यांचा आदर्श ठेवून अलिबाग, रोहा व मुरुड येथे खुप सामाजिक कार्य केले आहे. तसेच, कार्य श्रीवर्धन तालुक्यात करण्याचा मानस आपल्या भाषणातून व्यक्त केला आहे. तसेच, पुढील काही दिवसांत श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात 1 हजार मोफत सायकल वाटप आणि ज्येष्ठ व्यक्तींना चष्मा वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे देखील चित्रलेखा पाटील यांनी संगितले आहे.
यावेळी व्यवस्थापन समिती चेअरमन तथा शेकाप श्रीवर्धन तालुका चिटणीस विश्वास तोडणकर, बापट, इंद्रकांतजी हावरे, सचिन मापुस्कर, म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील, केंद्रप्रमुख श्याम पाटील आणि शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री किर व सना काठेवाडी यांनी केले. तर, आभार प्रदर्शन दिनेश वाणी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश शिरवटकर, वैशाली लिंगायत, प्रार्थना पाटील, दिनेश वाणी व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.