। अलिबाग । प्रतिनिधी ।
महावीर जयंतीनिमित्त पीएनपी बी. एड. महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांनी एका सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून चौल येथील “निलाश्री सहजीवन वृद्धाश्रम“ या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका रुतीषा पाटील व स्नेहल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या वृद्धाश्रमाचे विश्वस्त डॉ. केदार ओक, येथील व्यवस्थापक हर्डीकर, येथील इतर सेवकवर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले. या भेटीत विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्यासाठी मनोरंजनपर कार्यक्रम सादर केले, तसेच फळे, स्नेहभेट वस्तू आणि खाऊ भेट स्वरूपात दिले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, वृद्धाश्रमातील आजी-आजोबांशी गप्पा करताना आपुलकीची अनुभूती मिळाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक बळकट झाली असून, अशा उपक्रमांची पुनरावृत्ती करण्याची इच्छा सर्वांनी व्यक्त केली. महावीर जयंतीचा खरा अर्थ अहिंसा, करुणा आणि सेवा या मूल्यांत आहे. हा संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजावा, या हेतूनेच हा उपक्रम राबवण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापिका रुतीषा पाटील व स्नेहल पाटील यांनी ही भेट घडवून आणण्यासाठी विशेष मेहनत घेतली.