दिल्लीविरुद्ध रो‌‘हिट’; मोठ्या विक्रमांना गवसणी

| मुंबई | प्रतिनिधी |

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोहित शर्माने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 27 चेंडूत 49 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याची ही खेळी विक्रमीही ठरली. या खेळीदरम्यान रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये 1500 व्यांदा चेंडू सीमापार करण्याचा म्हणजेच 1500 बाऊंड्री मारण्याचा विक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय ठरला. आत्तापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये 1500 बाउंड्री कोणत्याच भारतीय क्रिकेटपटूला मारता आलेल्या नाहीत. त्याच्यापाठोपाठ विराट कोहलीने 1486 बाऊंड्री मारल्या आहेत. दरम्यान 7 एप्रिलपर्यंत टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बाऊंड्री मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर ख्रिस गेल आहे. त्याने 2196 बाऊंड्री मारल्या आहेत.

सर्वाधिक बाऊंड्री मारणारे क्रिकेटपटू
2196 - ख्रिस गेल
1855 - ऍलेक्स हेल्स
1673 - डेव्हिड वॉर्नर
1670 - कायरन पोलार्ड
1557 - ऍरॉन फिंच
1503 - रोहित शर्मा
रोहितच्या दिल्ली विरुद्ध 1000 धावा
रोहितने या खेळीदरम्यान दिल्लीविरुद्ध 1000 धावाही पूर्ण केल्या. त्याने यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धही 1000 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो आयपीएलमध्ये दोन संघांविरुद्ध 1000 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तिसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम केवळ डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहलीला करता आला आहे.
Exit mobile version