अलिबाग आगारात रस्ता सुरक्षा अभियान

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व अलिबाग राज्य परिवहन आगार यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रस्ता सुरक्षा अभियान-2023 प्रारंभ अलिबाग आगारात करण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, मोटार वाहन निरीक्षक शशिकांत तिरसे, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा,अलिबाग श्रीमती सूवर्णा पत्की, राज्य परिवहन रायगड विभागाचे विभाग नियंत्रक पंकज ढावरे, विभागीय वाहतूक अधिकारी प्रशांत खरे, अलिबाग आगार व्यवस्थापक अजय वनारसे, उपप्रादेशिक विभागाचे, राज्य परिवहन मंडळाचे इतर अधिकारी-कर्मचारी, चालक,वाहक, तांत्रिक विभागाचे कर्मचारी, जेएसएम महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनाअपघात सलग 15 वर्षे सुरक्षित सेवा बजावलेल्या चालकांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी जेएसएम महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रस्ता सुरक्षा या विषयावरील अतिशय उत्कृष्ट पथनाट्य सादर केले.

Exit mobile version