राम मरवडे यांची अध्यक्षपदी नियुक्ती
| रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी या ग्रा.पंचायतीचे माजी सरपंच राम मरवडे यांची रोहा तालुका रास्तभाव अन्नधान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तालुका रास्तभाव अन्नधान्य दुकानदार संघटनेची सभा माजी अध्यक्ष मोतीराम तेलंगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.व या सभेप्रसंगी मरवडे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी उद्देश वाडकर, सचिव अनिल भगत,शरद झेमसे, खजिनदार संतोष दिवकर, विभाग प्रमुखपदी बिपिन गांधी कोलाड, हिराजी शिंदे नागोठणे, प्रिती खांडेकर मेढा, संजय नाकती घोसाळे,विभावती चोरगे भातसई, नरेश पाटील वरसे, धर्माजी कोळी चणेरा, विनित जाधव खांब, शरद शिंदे चिंचवली, अनंत वाघ नागोठणे, तानाजी दळवी कुडली, राजु गुजर रोहा शहर, प्रसिद्धीप्रमुख रघुनाथ कडू व किरण मोरे आदींची निवड करण्यात आली आहे.