रोहित कर्णधार पदावरून होणार पायउतार; हार्दिक होणार टी-२०चा कर्णधार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये भारतीय संघाला खास कामगिरी करता आली नाही. सेमीफायनल लढतीत भारताचा पराभव झाला आणि संघ बाहेर झाला. या पराभवानंतर टीम इंडियात लवकरच मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने यावर गंभीर विचार करण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या काही वर्षात भारतीय क्रिकेट संघाला आयसीसीच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही. यामुळेच आता बीसीसीआय मर्यादित षटकांसाठी वेगळा म्हणजे टी-२० साठी आणि वनडे साठी दोन वेगवेगळ्या कर्णधारांचा विचार करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार ही योजना जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेपासून ही गोष्ट लागू करू शकते. या सर्वपार्श्वभूमीवर हा प्रश्न निर्माण झाला आहे की बीसीसीआयने आता अचानक पॅनिक बटन का दाबले.

हार्दिक होणार टी-२०चा कर्णधार
भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे आणि टी-२० मालिकेत दोन वेगवेगळे कर्णधार असू शकतील. अशा स्थितीत रोहित शर्मा वनडे संघाचे तर हार्दिक पंड्या टी-२० संघाचे नेतृत्व करताना दिसले. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात प्रत्येकी ३ सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका होणार आहे.

रोहितचा वर्कलोड कमी होणार
मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळे कर्णधार नियुक्त करण्याचा अर्ध म्हणजे रोहित शर्माला टी-२० संघाचे कर्णधारपद सोडावे लागले. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, हा विषय कर्णधारपद गमावण्याबद्दलचा नाही. रोहितच्या भविष्य आणि वर्कलोड कमी करण्याबाबतचा आहे. हे खेळाडू आता युव नाहीत. आम्हाला वाटते की टी-२०साठी नवा दृष्टीकोन आणि युवा खेळाडूंची गरज आहे.

Exit mobile version