। पेण । वार्ताहर ।
विधान परिषद सदस्य आ.अनिकेत तटकरे यांनी जिल्ह्यातील बोगस न्यूज पोर्टल पत्रकारांकडून जनतेला होणार्या त्रासाबद्दल मार्चमध्ये झालेल्या अधिवेशनात या औचित्य मुद्दयावरून लवकरच रायगड पोलिसांद्वारे कारवाई होणार असल्याने अशा पत्रकारांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हयात अनेक ठिकाणी काही उत्साही व अतिउत्साही संपादकांनी स्वतःचे न्यूज पोर्टल सुरू केलेले आहे. यात काही संपादकांनी नवीन न्यूज चॅनेल तयार करून आर.एन.आय. चा उल्लेख केलेला आहे. रजिस्टे्रशन न्यूज पेपर ऑफ इंडिया ही सरकारी यंत्रणा फक्त वृत्तपत्राशी संबंधित असून न्यूज पोर्टल डिजीटल मिडीयाशी काही एक संबंध नसल्याने कायदेशीररित्या अधिकृत नसून बोगस असल्याचे निदर्शनास आले आहेत. अशा बोगस पत्रकारांकडून सर्वसामान्य जनतेचे ब्लॅकमेकिंग, लुटमारीचे प्रकार व फसवणुक होत असल्याच्या वारंवार तक्रारी येत असल्याने अशा बोगस पत्रकारांविरूध्द कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना रायगडातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकार्यांना गृहविभाग प्रशासनाकडून आल्या आहेत. याबाबतचे परिपत्रक दयानंद गावडे यांनी पाठविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अतिउत्साही बोगस न्यूज पोर्टल व पत्रकारांचे धाबे दणाणले आहेत.