| रसायनी | वार्ताहर |
रानसई स.नं. 64/1 या आदिवासी शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित असणाऱ्या जमिनीमधून आरवी लॉजिस्टिक पार्क प्रा.लि. कंपनीने अवैधरित्या माती उत्खन्न केली आहे. त्याप्रकरणी संबंधितांनी अनेकदा महसूल खात्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर अवैधरित्या केलेले माती उत्खन्नाचे मोजमाप घेऊन मंडळ अधिकारी वावोशी यांनी तहसीलदार यांना अहवाल सादर केला होता. त्याअनुषंगाने खालापूर तहसीलदारांनी डिसेंबर 2023 रोजी आदेश दिले आहेत. त्यामध्ये 1 हजार ब्रास माती काढण्यासाठी परवानगी घेतली असल्याचे म्हटले आहे. तर, 1296.60 ब्रास इतक्या अधिकच्या प्रमाणात माती उत्खन्न झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार रक्कम 60 लाख 6 हजार 824 एवढा दंड करून 30 दिवसाचे आत आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. कंपनीने भरणेचा आहे, आदेश दिले होते, परंतु दंड भरला नाही. तहसीलदार अभय चव्हाण यांनी आरवी लॉजिस्टिकच्या नावे असणाऱ्या सातबाराचा शोध घेतला आणि त्यांच्या नावे असणारे रानसई येथील सर्व्हे नं. 20, 26/2, 21/2 असे तिन्ही सातबारावर अनधिकृत गौण खनिज उत्खन्न दंड रक्कम 60 लाख 6 हजार 824 एवढा बोजा बसविण्यात आला आहे.







