रियानची तिखट प्रतिक्रिया

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आसाम संघामध्ये चांगली कामगीरी करत पुन्हा तिच लय आयपीएलमध्ये दाखवून रियान पराग अलिकडच्या काळात चांगलाच चर्चत आला आहे. आता पून्हा एकदा रियानने टी-20 विश्‍वचषकाबाबत वादग्रस्त विधान केला आहे.

कोणत्याही परिणामांची चिंता न करता बेधडकपणे आपले विधान मांडणारा युवा खेळाडू रियान परागने टी-20 विश्‍वचषकावर मोठे वक्तव्य केले आहे. एका संभाषणात रियान परागला जेव्हा आगामी टी-20 विश्‍वचषकासाठी टॉप-4 संघ काय असतील याबद्दल विचारले असता साहसी प्रतिक्रिया देत रियान म्हणाला, मला टी-20 विश्‍वचषक पाहण्यात कोमताही रस नाही. जेव्हा टी-20 विश्‍वचषकासाठी माझी निवड होईल तेव्हा मी पाहीन आणि त्यावेळी टॉप-4 संघाबद्दल विचार करेन, असं वक्तव्य परागने केले आहे.

Exit mobile version