निराधार बालकांना ‌‘साथी’चा आधार

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार

| रायगड | प्रतिनिधी |

समाजामध्ये असंख्य निराधार बालके आहेत, अशा बालकांना कागदोपत्री कोणतीही तरतूद नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्याचा गांभीर्याने विचार करून त्यांना आधार देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून साथी समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव व साथी समितीचे अध्यक्ष तेजस्वी निराळे यांनी दिली.

नवी दिल्ली राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड यांच्यातर्फे निराधार व भटक्या सभातीच्या बालकांच्या हक्कांना आधार देण्याकरिता साथी समिती गठीत करण्यात आली आहे. साथी समितीचा मूळ उद्देश निराधार बालकांच्या हक्कांना आधार देणे म्हणजेच समाजामध्ये जी निराधार बालके आहेत, त्यांना कोणताही आधार नाही. कागदोपत्रीदेखील कोणता पुरावा नाही, अशा बालका नाम साती समितीतर्फे 27 जून ते पाच ऑगस्ट या कालावधीमध्ये मोहीम राबवली जाणार आहे. सदरील समिती निराधार बालकांचा सर्वे करून त्या बालकांना आवश्यक व महत्त्वाचे असणारे आधार कार्ड काढून देणार आहे. त्यामुळे बालकांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तसेच त्यांच्या अन्य वैयक्तिक ओळखीकरिता मोलाची मदत होणार आहे. या समितीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव व साधी समितीच्या अध्यक्षा तेजस्विनी निराळे यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

समितीमध्ये विधी सेवा यंत्रणा, स्थानिक प्रशासन, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, पोलीस, आरोग्य, शिक्षण विभाग, सामाजिक संस्था, बालकल्याण समिती, विधिज्ञ, विधी स्वयंसेवक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, संबंधित सर्व एनजीओ, शासकीय व अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला असून, सर्व शासकीय स्तरावर एकत्रित बालकांसाठी काम करून निराधार बालकांना न्याय देण्याचे कार्य राबविले जाणार आहे. याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव व साथी समितीचे अध्यक्ष तेजस्वी निराळे यांनी सर्व जनतेला आवाहन केले आहे की, आपल्याला माहीत असलेल्या निराधार बालकांची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग या कार्यालयाकडे पाठवण्यात यावी व योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

Exit mobile version