| श्रीवर्धन । वार्ताहर ।
शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक एक येथे रोहिदास अंगणवाडी क्र.46 व कुंभार आळी अंगणवाडी क्र.50 यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारचे सही पोषण देश रोशनअभियान राबविण्यात आले. या अभियानात महिला पालकांसाठी पाककृती आणि फळ भाज्यांचे महत्व सांगितले गेले. चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार महत्वाचा आहे तसेच लोकांना आपल्या जीवनात पोषण व त्याचे महत्त्व जागरूक करण्यासाठी व कुपोषणाला आळा घालण्यासाठी दर वर्षी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण आहार महिना अभियान साजरे करण्यात येते.निरोगी जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी निरोगी खाण्याच्या पध्दतीने मूल्य व योग्य पोषण याबद्दल सामान्य लोकांमधे जागरुकता निर्माण करणे हा अभियाना मागचा उद्देश आहे. सदरचे अभियान यशस्वी करण्यासाठी निकीता करडे, रिध्दी करंजकर, मदतनीस श्रीवर्धनकर, बिर्जे यांचे सहकार्य लाभले.