| मुंबई | प्रतिनिधी |
पी.एन. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडने मंगळवारी (10) आपली प्राथमिक समभाग विक्री खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. बोली/ऑफर बंद होण्याची तारीख गुरुवार, 12 सप्टेंबर आहे. ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर्ससाठी 456 रु. ते 480 रु चा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 31 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 31 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू 8,500 दशलक्ष रु.पर्यंत आहे आणि 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची विक्री 2,500 दशलक्ष रु.पर्यंत आहे. एकूण ऑफर साईजमध्ये 11,000 दशलक्ष रु.पर्यंतचे 10 रु.चे दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स आहेत. विक्रीची ऑफरमध्ये बिझनेस ट्रस्ट (प्रवर्तक विक्री शेअरधारक) कडून 2,500 दशलक्ष रु. पर्यंत 10 रु. चे दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स आहेत.
प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणेंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात प्रक्रियेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या अनुषंगाने सादर केलेले इक्विटी शेअर्स आणि वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. कंपनीला 3 जुलै 2024 रोजीच्या पत्रााद्वारे सूचीबद्ध करण्यासाठी तत्त्वातः मान्यता प्राप्त झाली आहे. मोतिलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वी एडलबाईस सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) आणि कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.