महाड येथे महामानवाला अभिवादन

| तळा | वार्ताहर |

चवदार तळे सत्याग्रहाच्या 97 व्या वर्धापनदिनी तळा तालुक्याच्या वतीने चवदार तळे महाड येथे महामानवाला अभिवादन बुधवारी (दि.20) करण्यात आले. यावेळी रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या श्रामणेर/बौद्धाचार्य शिबिर व महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरातील शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तळा तालुक्यातून मालूक व तळा शहर येथे आयोजित केलेल्या महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरातील 29 शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तळा तालुक्यातून महिला उपासिका साक्षी गायकवाड, अर्चना पवार यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी तळा तालुक्यातून भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पदाधिकारी व समविचारी भीम अनुयायी उपस्थित होते.

Exit mobile version