क्रांतीदिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना

। चिरनेर । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील चिरनेर येथे 25 सप्टेंबर 1930 साली झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना क्रांतिदिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. चिरनेर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंगळवारी दि.9 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच संतोष चिरलेकर, ग्रामविकास अधिकारी महेश पवार यांच्यासह सर्व सदस्य राजिपचे सदस्य बाजीराव परदेशी, उरणच्या उपसभापती शुभांगी पाटील तसेच मान्यवर उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्य चळवळत महत्वाची भूमिका बजावणारा 1930 सालचा चिरनेर जंगल सत्याग्रहात परिसरातील आठ हुतात्म्याने प्राणाचे बलिदान दिले. त्यांचे स्मारक चिरनेर येथे उभारण्यात आले आहेत. क्रांतिदनानिमित्त या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीरांना पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली.

Exit mobile version