जलतरणपटूंचा सत्कार आ. जयंत पाटील यांच्या हस्ते

| खोपोली | प्रतिनिधी |

कर्नाळा स्पोर्ट्स क्लब येथे स्विम एन स्पार्कचे सर्वेसर्वा मदन कटेकर याच्या संकल्पनेतून कोकण विभागीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आली. स्पर्धेचे उद्घाटन संदीप कदम, उपजिल्हाधिकारी मुंबई मंत्रालय यांच्या हस्ते, तर विजेत्या जलतरणपटूंचा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज जलतरण चषक 2023 स्पर्धेत पोहण्याच्या फ्री स्टाईल, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक, बटरफ्लाई अशा प्रकारात विविध आठ वयोगटातील एकूण 507 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग होता. यामध्ये मास्टर्स पुरुष गट दीपक ठाकूर, मास्टर्स महिला गट हेमांगी गावंड, खुल्या पुरुष गटात सुचित पाटील, खुल्या महिला गटात स्वराली म्हात्रे, 17 वर्षाखालील मुले शुभम जोशी, मुली- रिया शर्मा, 14 वर्षाखालील मुले, अथर्व पाटील, मुली- दक्षाजा देव उपरती, 12 वर्षाखालील मुले शंतनु कैचे, मुली- अमिता रुद्रा, 10 वर्षाखालील रायान सय्यद, मुली- निधी सामंत, 8 वर्षाखालील मुले प्रिन्स काठावळे, मुली- माही जांभळे, 6 वर्षाखालील मुले इब्राहिम खान, मुली- नायरा पटेल या स्पर्धकांनी जलद जलतरणपटू चषकचा मान मिळविला. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता प्रा. जयवंत माने, क्रीडा संचालक, के.एम.सी. महाविद्यालय, खोपोली, किशोर पाटील, सचिन शिंगरूट, नीलकंठ आखाडे, श्री. हितेश भोईर, श्री.ओमकार आदी विशेष सहकार्य लाभले.

Exit mobile version