राज ठाकरेंविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक

शरद पवारांचा टोला
मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीवाद वाढीस लागल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या या आरोपाला आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलेलं आहे. राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असा खरमरीत टोला लगावला आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मात्र राज ठाकरेंना जसे बाबासाहेब पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. अशी टीका केली आहे. दरम्यान,मनसेनेनेही संभाजी ब्रिगेडला आक्रमक उत्तर देत लायकीत रहायचे असा इशारा दिला आहे.

ओबीसींची फसवणूक
आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारनं घटनादुरुस्ती विधेयक मांडल्यामुळं आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे असं अनेकांना वाटलं होतं. पण हा गैरसमज असून ओबीसींची शुद्ध फसवणूक आहे. आधी हात बांधायचे आणि मग जेवणाचं आमंत्रण द्यायचं, जेवण वाढायचं अशातला हा प्रकार आहे,फ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्र सरकारवर केला.

Exit mobile version