। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील कांदळे येथील समृद्धी मोते हीने राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत मुंबई युनिव्हर्सिटीमधून कांस्यपदकाची कमाई केली आहे. समृद्धी मोते ही नागोठणे येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाची विद्यार्थीनी असुन ती तृतीय वर्ष बी.एस.सी या वर्गात शिकत आहे.
माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे 17 व्या महाराष्ट्र राज्य अंतर्विद्यापीठीय अविष्कार संशोधन स्पर्धा पार पडल्या. यावेळी, समृद्धी मोते हिला रायगड झोनमधुन मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली. तिने पर्यावरण पूरक औषधी वनस्पती पासून तयार केलेली पावडर प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय होऊ शकते, यावर संशोधन करून अविष्कार केला आहे. अतिशय दुर्गम भागातील मुलगी संपुर्ण महाराष्ट्रातुन पहिल्या तीनमध्ये येणे ही फार मोठी कौतुकास्पद बाब आहे. तिच्या या यशाबद्दल विविध स्थरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.