श्री साई ट्रस्ट कडून वेणगाव येथील शाळेसाठी स्वच्छता गृह

| नेरळ | वार्ताहर|

कर्जत तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्ट काम करीत असते. त्या ट्रस्टच्या माध्यमातून आणि सील फाउंडेशन यांच्या सहकार्याने तालुक्यातील वेणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यंसाठी स्वच्छतागृह बांधून देण्यात आले. 

  सील फाउंडेशन मुंबई व श्री साई ट्रस्ट नवी मुंबई यांच्या संयुक्त माध्यमातून कर्जत तालुक्यातील धाकटे वेणगाव येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधून देण्यात आले होते. त्या स्वछतागृहाचे लोकार्पण सील फाउंडेशन मुंबईच्या श्रीमती पूजा श्रीवास्तव यांचे हस्ते झाले.साई ट्रस्टचे श्री गणेश अय्यर,राधिका घुले, दिलीप घुले तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालक तसेच वेणगाव शाळेच्या मुख्याध्यापिका शिरसाठ तसेच शिक्षक संजय देशमुख आदी उपस्थित होते. 

Exit mobile version