संजय मोकल कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अहमदाबाद येथे होणार्‍या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी रायगडचे माजी राष्ट्रीय खेळाडू संजय मोकल यांची निवड करण्यात आली आहे.

संजय मोकल हे पेण तालुक्यातील करावी गावातील नवतरुण क्रीडा मंडळाचे खेळाडू आहेत. मोकल यांनी रायगड जिल्हा कबड्डी संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. त्यांनी रायगड जिल्हा पुरुष व महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे. याआधी मोकल यांनी महाराष्ट्र राज्य संघाचे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. मोकल यांची महाराष्ट्र राज्य संघाच्या प्रशिक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Exit mobile version