। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना फोडल्यानंतर भाजपा आता शिंदे गट फोडायच्या तयारीत आहे, असा दावा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी केला आहे. पक्षांची फोडाफोटी करणे हे भाजपाचे राजकारण आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनाी एकनाथ शिंदेंच्या नाराजीला कंटाळून भाजपाकडून शिंदे गट फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी प्रतिक्रिया दिली. भाजपाने आधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, आता शिंदे गट आणि अजित पवार गट फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पक्ष फोडाफोटी करणे हेच भाजपाचे राजकारण आहे. तसेच, वापरा आणि फेकून द्या, ही भाजपाची रणनीती आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.