| नवीन पनवेल | वार्ताहर |
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एर्टिगा कारने वाहनाला धडक दिल्याने यात कारमधील सहा जण जखमी झाले. चालक शुभम चौरसिया हे तुळजापूर ते भाईंदर जात असताना किमी 12 मुंबई लेन वर आले असताना समोरील अनोळखी वाहनास पाठीमागून जोरदार ठोकर मारल्याने अपघात झाला. या अपघातात चंद्रकांत महाले, रवींद्र हिरे, सुशांत महाले, छाया महाले, संगीता हिरे, स्नेहल हिरे यांना किरकोळ दुखापत झालेली आहे.