। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्याच्या चाकण परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वराळे येथील कैलास स्टील एंटरप्रायझेस या कंपनीच्या मालकावर अज्ञात इसमाने गोळीबार केला आहे. यात मालक जखमी झाला असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी मालक कंपनीबाहेरच उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला होता. या गोळाबारातर एक गोळी कंपनी मालकाच्या पोटात लागली होती. त्यामुळे जखमी अवस्थेत कंपनी मालक जमीनीवर पडले होते. या घटनेनंतर कर्मचार्यांनी लगेचच कंपनी मालकाला रूग्णालयात दाखल केले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.