। मुंबई । प्रतिनिधी ।
संजय राऊत पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात गेले 35 दिवस संजय राऊतांनी तुरुंगात काढले आहेत. सोमवारी राऊतांची न्यायालयीन कोठडी संपली होती. राऊतांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं असता दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पत्रचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतांचा जेलमधला मुक्काम पुन्हा वाढला आहे.