तळा येथे संत रोहिदास जयंती साजरी

। तळा । प्रतिनिधी ।

तळा शहरात संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रोहिदास नगर येथे संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रात्री रोहिदास समाज सभागृहात जेष्ठ नागरिकांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रोहिदास महाराजांच्या जीवनकार्याची महती सांगण्यात आली. तसेच, गावातील मुलामुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील मुलामुलींनी पारंपरिक गीतांवर आपल्या कलेचे सादरीकरण केले. बक्षीस वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी संत रोहिदास नगर ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version