सरिता गोंधळी यांचे निधन

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील चिरनेर कातळपाडा येथील सरिता संतोष गोंधळी (55) यांचे रविवारी (दि.3) निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर चिरनेर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत, चिरनेर पंचक्रोशीतील जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पती, दोन कन्या, एक पुत्र, असा आप्त परिवार आहे. सरिता गोंधळी यांच्या दशक्रिया विधी मंगळवारी (दि.12) श्रीक्षेत्र चिरनेर खाडी येथे सकाळी आठ वाजता होणार आहे. तर, उत्तरकार्य विधी शुक्रवारी (दि.15) चिरनेर कातळपाडा येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती संतोष गोंधळी यांनी दिली आहे.

Exit mobile version