सर्पमित्राने दिले अजगरास जीवदान

। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील संभे गावचा सर्पमित्र सागर दहिंबेकर आणि त्याचे अन्य सर्पमित्र परिवार यांनी 10 फुट अजगरास मोठ्या कौशल्याने पकडून जीवदान दिले आहे.संभे स्टाँपजवळील निशिकांत सानप यांच्या फर्निचर शॉपमध्ये लाकडी फर्निचर असलेल्या ठिकाणी अजगर दडून बसला असल्याची माहिती सर्पमित्र सागर दहिंबेकर याला मिळताच त्याने याबाबत आपले अन्य सर्पमित्र अजय भोसले,निलेश लोखंडे,अजय राजीवले, प्रथम भालेकर,संदेश यादव,सुरज भिसे,नितीन भोसले यांच्याशी संपर्क साधला. लाकडीफर्निचरमध्ये दबा धरून बसलेल्या मोठ्या लांबीच्या अजगरास मोठ्या शितापिने अजगराला पकडुन कोलाड विभाग वनाधिकारी राजेश तलकर,प्रवीण शिंदे यांच्या ताब्यात दिला.

Exit mobile version