सर्पमित्राने दिले समुद्री पक्ष्याला जीवदान

| मुरूड | प्रतिनिधी |
मुरूड समुद्रकिनारी जखमी अवस्थेत सापडलेल्या ब्लॅक टेल गुल समुद्री पक्ष्याला सर्पमित्र संदीप घरतने जीवदान दिले. या पक्ष्याला वनखात्याच्या अखत्यारीत पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली काही दिवस उपचार करुन पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.

काही दिवसांपूर्वी मुरूड समुद्रकिनारी संचार करीत असताना सर्पमित्र संदीप घरत यांना काही कुत्रे गुल पक्ष्याच्या मागे लागल्याचे दिसून आले. त्यावेळी घरत यांनी कुत्र्यांना पळवून या पक्ष्याचा जीव वाचविला; परंतु त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला उडता येत नव्हते.

त्याच्यावर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या मदतीने उपचार सुरू होते. काही दिवसांच्या उपचारानंतर पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या ब्लॅक टेल गुल पक्ष्याला सोडून देण्यात आले आहे. यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी सुदर्शन पाडावे उपस्थित होते.

Exit mobile version