। उरण । वार्ताहर ।
उरण महिला सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. 2024 मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेअंतर्गत उरणच्या महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरिता मी उद्योजिका उरणची हा व्हाट्सअॅप ग्रुप महिलांसाठी सुरू करण्यात आला होता.
उरणमधील अनेक महिला उद्योजिकांनी या ग्रुपमध्ये आपले लघुउद्योग, गृह उद्योग यांचे प्रमोशन केले व नक्कीच त्यातून त्यांना ग्राहक मिळण्यासाठी मदत झाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेने स्थापित केलेल्या मी उद्योजिका उरणची या व्हाट्सअप ग्रुपच्या वर्धापनदिनी उरणमधील उद्योजिका महिलांचे सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी उरण पोलीस स्टेशनच्या पीएसआय पद्मजा पाटील गोपनीय शाखेच्या पोलीस अधिकारी मानसी तांबोळी आणि पोलीस हवालदार यांची टीम उपस्थित होती. सदर कार्यक्रमात संस्था उपाध्यक्ष कल्याणी दूखंडे , सीमा घरत, गौरी मंत्री, अफशा मुकरी, दीपा मुकादम, जोस्ना येरुंनकर, नाहिदा ठाकूर, प्रगती दळी, उपक्रम कार्यकारिणी नीलिमा थळी, स्मिता पाटील, उरणच्या उद्योजिका विदूला कुलकर्णी, पूनम पाटेकर आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.