ऑफलाइन शिक्षणसाठी मिळणार स्कॉलरशिप्स

| अलिबाग | वार्ताहर |

विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त मागणीला प्रतिसाद देत त्यांच्या स्कॉलरशिप अ‍ॅडमिशन टेस्ट (एसएटी) च्या बहुप्रतिक्षित दुसर्‍या एडिशनच्या लॉन्चची घोषणा फिजिक्सवालाने केली आहे. पीडब्ल्यू एसएटी इयत्ता 8 वी ते 12वी च्या गुणवंत जेईई/नीट इच्छुकांना व ड्रॉपर्सना विद्यापीठ केंद्रांमधील अनुभवी प्राध्यापकांकडून उच्च दर्जाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळण्यासाठी जवळपास 90 टक्के स्कॉलरशिप्स मिळण्याची संधी देते. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दर्जेदार ऑफलाइन शिक्षण किफायतशीर व उपलब्ध करून देण्याच्या मनसुब्यासह पीडब्ल्यूचा आगामी शैक्षणिक वर्षामध्ये 160 कोटी रूपयांच्या स्कॉलरशिप्स प्रदान करण्याचा मनसुबा आहे. पीडब्ल्यू एसएटीचा आगामी टप्पा 14 मे पर्यंत दरररोज ऑनलाइन, 7 मे व 14 मे रोजी ऑफलाइन आयोजित करण्यात येईल.

आगामी शैक्षणिक वर्षात आमचा 160 कोटी रूपयांच्या स्कॉलरशिप्स देण्याचा मनसुबा आहे, जेथे गुणवंत विद्यार्थ्यांना यापूर्वीच 100 कोटी रूपयांहून अधिक मूल्य असलेल्या स्कॉलरशिप्स प्रदान करण्यात आल्या आहेत. गेल्या परीक्षेत लाखोहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निश्‍चितच प्रेरणादायी राहिला आहे आणि आम्ही आशा करतो की भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप्समधून फायदा होईल.

Exit mobile version