मोटार सायकलीला स्कॉर्पिओची धडक; एकाचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल जवळील शिरढोण गावाच्या हद्दीत असलेल्या कोकण एक्सप्रेस हॉटेल समोरील रस्त्यावर स्कॉर्पिओ चालकाने गाडी मागे घेऊन धडक दिल्याने मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोजकुमार रामबरन तिवारी याने त्याच्या ताब्यातील स्कॉर्पिओ गाडी कोकण एक्स्प्रेस हॉटेल समोरील रस्त्यावर अविचाराने व हयगयीने तसेच धोकादायक रीतीने गाडी मागे घेऊन मोटार सायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वार मिकदाद शब्बीर सुरतवाला (वय 32) हा गंभीररित्या जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .

Exit mobile version