| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील काकळघर, वावडुंगी, वेळास्ते, तेलवडे, कोर्लई या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अर्जांची छाननी सोमवारी (दि.5) छाननी होणार आहे. सकाळी 11 वाजता मुरुड तहसीलदार कार्यालया समोरील दरबार हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रोहन शिंदे व निवडणूक नायब तहसीलदार अमित पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्या या छाननीत कुणाचे अर्ज बाद होतात याकडे लक्ष लागले आहे.
सरपंचपदाकरीता 25 तर सदस्यपदाकरीता 116 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी किती उमेदवारी अर्ज वैद ठरतात तर किती अवैध ठरतात ते उद्या दुपार पर्यंत कळणार आहे. त्यानुसार प्रत्येक पक्षाकडून आप आपली रणनीती आखली जाणार आहे. या निवडणुकीत यंदा प्रथमच बाळासाहेबांची शिवसेना निवडणूकीच्या रिंगणात उभी आहे.