उपसरपंचपदी आत्माराम दळवी यांची निवड

| पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील माणगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापचे आत्माराम दळवी यांची बिनविरोध निवड. ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश साळुंखे, यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली, त्यावेळी सर्व सदस्यांनी एकमताने आत्माराम दळवी यांना पाठींबा देऊन उपसरपंच पदी घोषित केले. दळवी यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल शेकाप नेते, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे व्हा. चेअरमन लोकनेते सुरेश शेठ खैरे व शिवसेना शेकाप युतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या .

Exit mobile version