नवी मुंबईत रंगणार आईस स्टॉक स्पर्धेचा थरार
| नेरळ | प्रतिनिधी |
राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धेमध्ये नेरळजवळील वंजारपाडा येथे असलेल्या माथेरान व्हॅली स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठी भरारी घेतली. या शाळेच्या तब्बल नऊ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. काश्मीर प्रांतातील गुलबर्ग येथे राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा रंगली.
या स्पर्धेत वंजार पाडा नेरळ येथील माथेरान व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलचे 14 खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंपैकी शर्मिली खंजोडे- सुवर्णपदक, ओंकार पवार, रूपाली भूरभुरा यांनी रौप्यपदक पटकावले. तर, या शाळेच्या निसर्गा गवळी, दिशा शेळके, झारा शेख, गणेश भगत, यश इंदुलकर, सार्थक चव्हाण या खेळाडूंनी कांस्यपदके मिळविली. या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक सूर्यवंशी तसेच स्वप्नील अडूरकर, मोहिनी अडूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष महेश राठोड, उपाध्यक्ष जयेश चोगले यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झलेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धा दि. 24 जानेवारीला नवी मुंबई येथे होणार असून, नेरळजवळील वंजारपाडा येथील माथेरान व्हॅली स्कूलच्या नऊ खेळाडूंची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे.